तुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील ????

Wednesday, May 11, 2011

पान गळती झालेल्या झाडा प्रमणे..........

A Wild Cherry in flower. Français : Un Merisie...
 (Photo credit: Wikipedia)
पान गळती झालेल्या झाडा प्रमणे..........
सर्व पाने गळून जावीत आणि फक्त मी उरावी...
पान गळती झालेल्या झाडा प्रमणे..........
सर्व पाने गळून जावीत आणि फक्त मी उरावी...!!


मुळापासून बुंध्या पर्यंत एक हि पान नाही...
एक हि क्षण प्रश्न नाही कि उत्तर नाही...
निष्पर्ण शाखा विखुरलेल्या....
कुणालाच कुणाच भर नाही....

ग्रीष्माची झळ मला हि लागते आहे...
तुझ्या नजरेला खुपुदे काही...
सूर्याचे किरणच का...
माझे असणे हि लाही लाही...

पालवीची ती सुंदरता आणि  शाखांची हि रुक्षता.....
मी वसंत....मी शिशिर असुदे काही...
इथेच उभा असा नि तसा......
तरीही मला अस्तित्व  नाही.....
Enhanced by Zemanta

No comments:

Post a Comment

Thank you for your Comment. Appreciate your Interest in the blog!