तुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील ????

Wednesday, May 2, 2018

पाऊस होऊन गरजताना

पाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी
सरी  वर  सारी अन तू विशाल आभाळी .....

पाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी
थेंबे थेंबे तळे अन तू अथांग सागरी ........

पाऊस होऊन गरजताना तू आभाळ हव्वे अन मी पाणी
मधुर पंचमात तू राग धानी ......

पाऊस होऊन गरजताना  तू आभाळ व्हावे अन मी पाणी
मातीचा ओलावा अन कतार रात्र काली

पाऊस होऊन गरजताना  तू आभाळ व्हावे अन मी पाणी
चंद्राचे चांदणे अन चमकती चांदणी .....Sunday, February 1, 2015

माझी माती

माझी माती दूर राहिली, मिलता तुझी साथ
दिवस रात्र घटत गेले सरता आपली वाट...
मातीचा सुगंध तो, दरवालातो अजुन मनात,
एथे ही मातीच ती पण कोरडे शुष्क पाषाण...

अक्कन माती चिक्कन माती, अजोड़ तिचे घाट
गावच काय गल्ली बोळ एकसंध ताठ....
उंच भरारी, गगन चुंबी...
घरच काय काना कोपरा एकाकी तळ्यात....

झुलनारा वा रा अनातो  प्रेमाचा ओलावा,
महेरिचा सुगंध तो असा कसा तोलावा...
मिलेटना सगराला थेम्ब थेम्ब अडला....
असा तुझा संगम, मदगंध दरवालाला....

Sunday, December 29, 2013

फुगा

तुझा बरोबर उडायला,
तुझ्या बरोबर पाळायला,
तुझ्या बरोबर तरंगायला,
मला तुझे पण हवे आहे,
फुग्याच्या गतीने मला आकाश हवे आहे!

तुझ्या रंगाचे,
तुझ्या ढंगाचे,
तुझ्याच तुझ्या संगाचे,
मला अंग हवे आहे,
फुग्याच्या रंगाचे मला रंग हवे आहेत!

तुझ्या सवे , नि 
तुझ्या कावे,
मला तुझे मन हवे आहे,
फुग्याचे मला असे उस्वास हवे आहेत!

तुझे निश्चय,
तुझीच निर्भयता,
तुझ्या तुझ्या त्या,
उंच भरार्या,
फुग्याच्ग्या गती मला अथांग हवे आहे!

तुझा आनंद ,
तुझी चंचलता,
तुझी उंच उडी अन,
तुझी कला,
फुग्य तुझे जगणे हवे आहे!