तुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील ????

Thursday, July 1, 2010

झाड

मला निष्पर्ण झाडाने नेहमीच आकर्शित केले आहे...
लांब खुल्या फांद्या त्याच्या, आकाशा कड़े बघून नजाने काय मागत असतात..
त्याच्या कड़े बघताना एक अजबच निष्ठुरता जाणवते...ही त्याचीच का निसर्गाची हे कधी समजले नाही माला..
पान-गलती झाल्यावर त्याच्या देठाना सुधा थोडा श्वास झ्यायाला मिळत असेल...
त्याच्या कड़े काय तर फक्त हिरवी पाने नसतात...पण त्याच रंग अणि रूपाच बदलून जाते...
त्याचा शुष्क अणि कोरडेपण  असा उजलतो की बघत बसावे...
कदाचित विचित्र वाटेल पण......आपलेच प्रतिबिम्ब पहिल्या सारखे वाटते...
...कुठे न कुठे अपल्यातही  असेच शुष्क, उजाड़ झाड़ उभे असते.....
आपण ही उन-पावसाचा तटस्थ पने सामना करत असतो .....
फक्त आपन वाट बघतो ती नवी पालवी येण्याची........

No comments:

Post a Comment

Thank you for your Comment. Appreciate your Interest in the blog!